महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त

महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

पुर्नमुल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टी तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव गुरुवारी होणार्‍या महानगरपालिका महासभेत (Ahmednagar Municipal General Assembly) मांडला जाणार आहे. सदर प्रस्ताव अवास्तव असल्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) मधील अनेक संघटना एकत्र येऊन या करवाढीच्या (Tax increase) विरोधात बुधवार, 11 ऑगस्ट रोजी अकरा वाजता महानगरपालिकेच्या दारात धरणे आंदोलन करणार आहेत.

महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त
'प्रदेश युवक'च्या नेत्यांना राहुल गांधींनी दिल्लीत बोलावले आणि म्हणाले...

एकीकडे महानगरपालिका (AMC) नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असताना आणि दुसरीकडे गेल्या वर्षापासून जनता कोविडमुळे (COVID19) त्रस्त असताना महानगरपालिका कर कमी करण्याऐवजी तीनटीने कर वाढवीत आहे. यामुळे नगरकरांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था, पिण्यासाठी गडूळ पाणी, अस्वच्छतेमुळे शहराचे बिघळणारे आरोग्य प्रदूषणात झालेली लक्षणीय वाढ, इत्यादी जवळपास सर्व मूलभूत सोयी नागरिकांना देण्याबाबत महानगरपालिका अपयशी ठरली आहे. प्रस्तावित अवास्तव करवाढी विरुद्ध शहराच्या अनेक संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फौंडेशन, गजानन हाउसिंग सोसायटी, भारतीय जनसंसद, कामगार संघटना महासंघ, इकरा सोशल कल्ब आदी बुधवारी अहमदनगर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

नागरिकांनी महानगरपालिकेची अवास्तव करवाढ हाणून पाडावी असे आवाहन माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, बहिरनाथ वाकळे, अनंत लोखंडे, अर्शद शेख, फिरोज शेख, कॉ. महेबुब सय्यद, दिपक शिरसाठ, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, संध्या मेढे, भारतीय न्यालपेल्ली आणि अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com