सोशल मिडियावर युवतीला अश्लील मेसेज

गुन्हा दाखल
सोशल मिडियावर युवतीला अश्लील मेसेज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुळची मुंबई (Mumbai) व सध्या अहमदनगर शहरातील (Ahmednagar City) एका उपनगरात राहणार्‍या युवतीचा इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉटसअ‍ॅप ( WhatsApp)आणि मोबाईलवर फोन करून पाठलाग करण्याचा प्रयत्न करत अश्लील शब्दांचा उच्चार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ही घटना घडली.

पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास इन्स्टाग्रामवर अविनाश जरे नावाने खाते असलेल्या व्यक्तीने हाय डॉक्टर, असा मेसेज केला होता. त्यानंतर रात्री साडेदहाच्या दरम्यान व्हिडीओ कॉल (Video call) करण्यात आला होता. बुधवारी दुपारी फोन करून अश्लील शब्द वापरत विनयभंग केला. सोशल मिडीयावर वारंवार मेसेज करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेच्या भावाला फोन करत तुझ्या बहिणीला उचलून नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

पीडितेच्या फिर्यादीवरून दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. पी. गर्जे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com