खड्ड्यांविरोधात सोशल मीडिया सक्रीय

कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह
खड्ड्यांविरोधात सोशल मीडिया सक्रीय

अहमदनगर l प्रतिनिधी

शहरातील खड्ड्यांविरोधात सोशल मीडियावर राग व्यक्त करण्याचे प्रमाण महापालिकेच्या आवाहनानंतरही कमी झालेले नाही. आता बुजविण्यात येणाऱ्या खड्ड्यांबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. ज्याठिकाणी खड्डे पडले आहे, त्या रस्त्यावरील पडलेले खड्डे स्वच्छ करून रस्त्याची खोदाई करून काम करणे आवश्यक असताना ठेकेदारांनी जेसीपी मार्फत रस्त्यावर खडी टाकून काम सुरू केलेले आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर महापालिकेकडून सुरू असलेल्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने जर रस्त्याचा काम झाले तर एका महिन्याच्या आत रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडतील व संपूर्ण खडी पुन्हा निघून जाईल.

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त, शहर अभियंता यांनी सदर रस्त्यांची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासन निर्णयचा पालन करून रस्त्याचे कामे करावी, जर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास त्याच्या नुकसानीला जबाबदार आयुक्त व शहर अभियंता राहतील, असेही या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.