...तर मलाही मंत्रिपदाची संधी - खा. डॉ. विखे

...तर मलाही मंत्रिपदाची संधी - खा. डॉ. विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर (प्रतिनिधी) \ Ahmednagar - कोणत्याही नेत्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात आत्मीयता असते. त्यामुळे आपल्या नेत्यासाठी त्यांना पक्षाकडून अपेक्षा असणे सहाजिक आहे. मात्र, भाजपमध्ये पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जातो. त्यामध्ये नंतर बदल होत नाही. पक्ष प्रत्येकालाच खूष करू शकत नाही. याचा विचार कार्यकर्त्यांनीही केला पाहिजे, उद्या पंतप्रधान मोदींना माझे काम आवडले, तर मलाही मंत्रिपदाची संधी मिळेल, असा अशावाद खा. डॉ. सुजय विखे यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे नाराज असून त्यांच्या समर्थकांनी पक्षातील पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या उलटसुलट चर्चेला उधाण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खा. विखे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज नाहीत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना खा. विखे म्हणाले, माझ्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा होतीच. मला स्वत:ला त्याचे काहीच वाटत नाही. भाजपमध्ये मंत्री आणि खासदार यांना समानच वागणूक मिळते. गेल्या दोन वर्षांत भरपूर कामे करता आली. आता मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांशीही आपले चांगले संबंध आहेत. त्यांचा उपयोग मतदारसंघातील कामांसाठी होणार आहे, असेही ते म्हणाले.

...............

पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, पण सुविधाही मिळाल्यात

इंधन दरवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनांसंबंधी बोलताना खा. विखे म्हणाले, इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना करोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा. 35 हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच काम राज्य सरकारकडे होते, तेव्हा जागतिक निविदा काढूनही त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या या जनहिताच्या कामाचीही नोंद घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com