जिल्हयात आतापर्यंत ४३६५ रुग्ण करोनमुक्त
सार्वमत

जिल्हयात आतापर्यंत ४३६५ रुग्ण करोनमुक्त

आज ३४० रुग्ण बरे होऊन परतले घरी

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज ३४० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील ४३६५ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा १९७, संगमनेर १४, राहाता १७, पाथर्डी २७, नगर ग्रा.१०, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ८, नेवासा १०, श्रीगोंदा ९, पारनेर ७, अकोले १, राहुरी ४, शेवगाव ६, कोपरगाव १, जामखेड ४, कर्जत ७, रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com