ग्रामीण रूग्णालयाची उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता - कोल्हे

ग्रामीण रूग्णालयाची उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता - कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरात असलेले ग्रामीण रूग्णालय 30 खाटांचे असून त्यासाठीची अद्ययावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण असून या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे, या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे.

तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचेकडे पत्रव्यवहार करून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ करून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे म्हणून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी पत्रव्यवहार केला. शहरातील महाराष्ट्र शासनाच्या 6 एकर जमीनीवर 30 खाटांचे शासकीय ग्रामीण रूग्णालय सुरू असुन यासाठी अद्ययावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधून पूर्ण झालेले आहे. परंतु दिवसेदिवस लोकसंख्या वाढीमुळे सदर रुग्णालय कमी पडत असून रुग्णाची संख्या मोठी असल्याने वैद्यकिय सुविधा कमी पडतात.

यासाठी या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली होती. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषांनुसार जोडबहृत आराखडयामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. आयुक्त, आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई यांनी प्रस्तावास मान्यता दिली आहे. कोपरगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत होते, या निर्णयामुळे पुरेशी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com