देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान - स्नेहलता कोल्हे

देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान असून त्यातून संस्कार चेतना प्राप्त होत असते, असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील घारी हद्दीतील श्री जगन्नाथ भगवान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री चिन्मयानंद स्वामी, श्रीश्री 1008 स्वामी पूर्णानंदजी चैतन्यजी महाराज, 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज, ब्रम्हगिरी चैतन्य महाराज, साध्वी अनन्या स्वामी, गोवर्धनगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत पार पडला.

त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. स्नेहलता कोल्हे यांच्याहस्ते विधिवत मंत्रोच्चारात फित कापून या सोहळ्याचे लोकार्पण करण्यात आले. घारी गावाला प्राचीन कालीन ऐतिहासिक महत्त्व आहे. धार्मिक व प्रफुल्लित असे निसर्गरम्य वातावरणात या मंदिराची उभारणी झालेली असून पंचक्रोशीतील भाविकांना यातून अध्यात्म स्फूर्ती निश्चित मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.