मतदार संघातील त्या 10 गावांना आमदारांनी वार्‍यावर सोडले - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

मतदार संघातील त्या 10 गावांना आमदारांनी वार्‍यावर सोडले - स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत असतांना मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. राहाता तालुक्यातील चितळी गावात एक महिन्यात मृत्युचे अर्धशतक गाठलेले आहे.

ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी करुन या भयंकर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत.मतदार संघातील या नागरीकांना त्यांनी वार्‍यावर सोडले का? असा सवाल भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे.

कोपरगांव मतदार संघातील चितळी गावत अक्षरक्ष:कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करुन घ्यावे असे आवाहन सौ.कोल्हे यांनी केली आहे. सौ. कोल्हे म्हणाल्या, वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे होते. संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असतांना जनजागृती तसेच प्राथमिक उपचार करुन रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक होते.

पंरतू योग्य ते नियोजन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. दुर्देवाने चितळीकरांवर आलेल्या या महाभयंकर संकटात अनेक जेष्ठ, तरुण तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे आता तरी लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. त्याकरीता संशयीत रुग्णांच्या अँटीजन चाचण्या व इतर तपासण्या करुन रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्या अशीही मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com