वारकर्‍यांच्या सेवेत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन - स्नेहलता कोल्हे

वारकर्‍यांच्या सेवेत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन - स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गेल्या दोन वर्षापासुन करोना महामारीमुळे सार्वजनिकरित्या पंढरीच्या दिंडया काढण्यावर मर्यादा होत्या. मात्र चालु वर्षी परवानगी मिळाल्याने या वारकर्‍यांच्या सेवेतच पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

सालाबादप्रमाणे महान तपस्वी कैकाडी बाबा व कोंडीराम काका यांची पायी दिंडी मनमाड ते पंढरपूर मार्गस्थ होतांना बुधवारी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे मुक्कामी होती. त्याचे स्वागत व पूजन करतांना सौ. कोल्हे बोलत होत्या. या वारकर्‍यांसमवेत स्नेहलता कोल्हे यांनी फेर धरत डोईवर तुळस घेवुन भजन संगीतात सहभाग देत वारीचा मनमुराद आनंद लुटला.

प्रारंभी व्यापारी नेते नारायण व गुलाब अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत करत दिंडीचे हे पंचविसावे वर्ष असल्याचे सांगितले. विरेष नारायण अग्रवाल व जगदिश खेमचंद अग्रवाल यांनी दिंडी परंपरा आणि मनमाड दिंडी सेवेची माहिती दिली. मुक्ता पाटील पानगव्हाणे यांनी वारकर्‍यांना दिंडी परंपराचे आवाहन करून कितीही कष्ट पडले तरी ती सुरू ठेवावी, असे आवाहन केले.

यातील सहभागी सर्व वारकर्‍यांना भोजनासाठी मोफत स्टील डबा व तुळशीचे रोप वाटप करण्यात आले. याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक माधवराव देशमुख, उद्योजक कांतीलाल अग्रवाल, डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ रमेश कोठारी, बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जोशी, डॉ. हेमंत राठी, डॉ. विलास आचारी, शिवाजी खांडेकर, जनार्धन कदम, रजनी गुजराती, तुषार विध्वंस, रोहित वाघ, विशाल आढाव, भंडारी, सी.बी. गंगवाल, मनसेचे संतोष गंगवाल, तुषार शिंदे, आदिनाथ ढाकणे, राजेश मंटाला, मुक्ताताई पाटील, सतीश रानडे, गोरख देवडे, सोमनाथ ताकवाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगाव शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सुशांत घोडके यांनी मानले. शेवटी वारकर्‍यासह उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com