बाप नावाचं वादळ नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल - स्नेहलता कोल्हे

चांदेकसारे येथे बाप नावाचं वादळ कवी संमेलन संपन्न
बाप नावाचं वादळ नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल - स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी बाप नावाचं वादळ प्रसिद्ध करून बापाची भूमिका कशी महत्त्वाची असते हे आपल्या काव्य संग्रहातून सांगितले. बाप नावाचं वादळ ही बाप सांभाळण्याची एक सामाजिक चळवळच त्यांनी उभी केली. निश्चितच नवीन पिढीला हे प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या स्व. एकनाथ सोनाजी खरात यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात आपली नोकरी सांभाळत असताना विविध सामाजिक शैक्षणिक चळवळीत भाग घेऊन समाज हितासाठी काम केले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘बाप’ नावाचं वादळ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. आपल्या मुलांना घडवण्यासाठी आईबरोबरच बाप महत्त्वाची भूमिका बजावत असतो मात्र हा बाप प्रत्येक वेळी उपेक्षित असतो. खरात कुटुंबियासोबत कोल्हे कुटुंबाचे अतुट असं नातं आहे. यापुढेही भविष्यात कोल्हे परिवार सदैव आपल्या पाठीशी राहील असं सौ. कोल्हेताई यांनी खरात कुटुंबियांना आश्वसित केले.त्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे राज्यस्तरीय महाकवी संमेलनात बोलत होत्या.

बाप नावाचं वादळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय महाकवी संमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे होते.

याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई सातभाई, संजय सातभाई, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, राज्यकर उपयुक्त दिलीप झाल्टे, सरपंच संजय गुरसळ, डॉ. सुभाष रणधीर, कल्याण होन, प्रभाकर होन, भाऊसाहेब होन, संध्या गायकवाड, पंडित भारुड, संगीता सोनवणे, रंजीत खरात, उज्वला कांबळे, संजय खरात, बाळासाहेब देवकर, ज्ञानेश्वर शिंदे, अरुण खरात आदी सह महाराष्ट्रभरातून आलेले कवी, लेखक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविक प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी केले. कुलगुरू व्ही एन मगरे, राजेश परजणे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कविसंमेलनात शंभरहून अधिक कविंनी सहभाग घेतला होता. या कवि संमेलनात सहभागी झालेल्या कवी लेखक यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन संध्या गायकवाड व पंडित भारूड यांनी केले तर रणजित खरात यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com