केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत करावी - स्नेहलता कोल्हे

केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत करावी - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

केश कर्तनालय व्यावसायिकांना दुकानदारी शिवायवाय पर्याय नसून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे.

वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा शासनाने निर्णय घेेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून नाभिक बांधवांना कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

राज्यातील वाढती रूग्णसंख्या पहाता मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउनची घोषणा केली. परंतु केवळ काही घटकांचाच विचार केला असून बहुतांशी घटक विचारात घेतलेले नाही. त्यामध्ये बारा बलुतेदार, छोटे व्यावसायिक फुलवाले तसेच केशकर्तनालय यांचेसाठी कोणतीच योजना नाही. वास्तविक नाभिक समाज हा स्वयंरोजगारातील सर्वात मोठा घटक आहे. मोठया प्रमाणात असलेल्या या घटकाचा राज्यशासनाने विचार करण्याची गरज होती. त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे या समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या लॉकडाउन मध्ये मोठया आर्थीक समस्यांचा सामना करत आर्थीक घडी बसविण्यासाठी कष्ट उपसाणार्‍या या बांधवावर पुन्हा संकट कोसळले आहे. दुकानांसाठी भाडेकरारावर घेतलेले गाळे, दुकाने यांचे भाडे थकलेले असुन मागील लॉकडाउन काळात थकलेली बील भरण्याची परिस्थितीही राहीली नसल्याने व्यावसायिक सैरभैर झालेले आहे. पुन्हा हेच संकट उभे राहिल्याने नागरीकांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. त्याकरीता शासनाने केशकर्तनालय दुकानदारांना मदत करावी, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com