कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार कामासाठी

राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, मोठी ऐतिहासिक परंपरा असलेली प्राचीन मंदिरे कोपरगाव विधानसभा मतदार संघात आहे. या मंदिरांची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे.

बेट परिसरातील दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर, कचेश्वर मंदिर, शहर परिसरात असलेला दत्त पार, सोमेश्वर मंदिर. तालुक्यातील अतिप्राचीन शिव मंदिर, श्री विष्णू मंदिर, यादवकालीन कचेश्वर मंदिर, शृगेश्वर देवस्थान, काशी विश्वेश्वर मंदिरबरोबर श्री क्षेत्र पुणतांबा येथील जगविख्यात कार्तिक स्वामींचे मंदिर, चांगदेव महाराजांची समाधी, महादेव मंदिर तसेच धामोरी येथील अडबंगनाथ देवस्थान अशा विविध ठिकाणचा या मध्ये समावेश असून पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्या या वास्तु खर्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे.

यांची जपवणुक करणे गरजेची बाब आहे. त्याकरीता राज्यशासनाने या प्राचीन मंदिरांच्या जिर्णोध्दार कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.