शेतकर्‍यांना मोफत बियाणे व खते द्यावीत - स्नेहलता कोल्हे

शेतकर्‍यांना मोफत बियाणे व खते द्यावीत - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील (Kopargaon assembly constituency) शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शासनाने या शेतकर्‍यांना मोफत बी बियाणे व खतांचा पुरवठा करावा (Provide free seeds and fertilizers to the farmers), अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehalta Kolhe) यांनी कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, चालू खरीप हंगामात सुरुवातीला काही ठिकाणी पाऊस बरसला. त्या आशेवर कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अजूनही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने (weather department) वर्तवलेला नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांनी कर्ज काढून, दाग दागिने गहाण ठेवून खरीप पेरणीसाठी (Kharif Sowing) महागाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे.

पाऊस नसल्यामुळे हे बी पूर्णपणे जळून गेले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यातच उष्णतेचा कहर (scorching heat) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. करोना आपत्ती दीड वर्षापासून सुरू आहे. करोनाच्या संकटानंतर (crisis of Corona) दुबार पेरणीचे संकट (Crisis of double sowing) शेतकर्‍यांवर ओढवले आहे. तेव्हा शासनाने या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी अशा कठीण प्रसंगी पुढे यावे व दुबार पेरणीसाठी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा.

त्याचप्रमाणे मागील पीक विम्याची रक्कम तात्काळ मंजूर करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर (Farmers Bank Accounts) जमा करावी, जेणेकरून त्यांना त्याचा आधार होईल. तेव्हा मायबाप सरकारने येथील शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी मोलाचा हातभार पुढे करून शेती व शेतकर्‍यांवर आलेले संकट दूर करावे, दुबार पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असेही स्नेहलता कोल्हे (Snehalta Kolhe) यांनी निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com