कोपरगाव तालुक्यासाठी स्व. कोल्हे यांनी जीवन समर्पित केले- सौ. कोल्हे

कोपरगाव तालुक्यासाठी स्व. कोल्हे यांनी जीवन समर्पित केले- सौ. कोल्हे

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलेदेखील देशासह परदेशात उच्चपदावर काम करत आहेत. कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करत स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपले जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन स्नेहलता कोल्हे यांनी केले.

चांदेकसारे येथे 19 बेघर कुटुंबांना मोफत जागेचे वाटप करताना सौ. कोल्हे बोलत होत्या. यावेळी तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट नेवासेचे अंकुश महाराज जगताप, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाबासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, केशवराव होन, अरुण येवले, संजय होन, संचालक ज्ञानदेव औताडे, विश्वासराव महाले, निलेश देवकर, रमेश आभाळे, निवृत्ती बनकर, बापूसाहेब बारहाते, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, अशोक होन, रावसाहेब होन, अण्णासाहेब चव्हाण, आप्पासाहेब औताडे, कांतीलाल होन, मनोहर शिंदे, जालिंदर चव्हाण, चंद्रकांत होन, आप्पासाहेब होन, प्रल्हाद होन, पी. ए. रंगनाथ लोंढे, विरेंद्र जोशी, अशोक आहेर, सागर रोहमारे, बाळासाहेब पानगव्हाणे, दत्तात्रय गायकवाड, थोरात, निलोबा महाराज सूर्यवंशी, गणेश गोंडे, सुनील पारे, अशोक महाराज, विश्वनाथ जावळे, शिवाजी जावळे, शामराव जावळे, योगेश जावळे, पिन्टुभाऊ होन, भाऊसाहेब होन, सोमनाथ होन, प्रभाकर होन, किशोर होन, दहे महाराज, पवार, विनायक आढेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदेकसारे ग्रामपंचायतीने वीस ते पंचवीस वर्षापासून गावात राहत असलेल्या गरीब व भटक्या विमुक्त जातीतील नंदीवाले 19 कुटुंबांना आपल्या हक्काची जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले.

माजी सरपंच केशवराव होन यांनी सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन व ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेत गावात मोकळी असलेली शासकीय जागेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत या गरजू 19 बेघरांना आपल्या हक्काची जागा उपलब्ध करून दिली. बेघर कुटुंबातील सदस्य काळू सयाजी पवार, नानासाहेब सयाजी पवार, सुरेश दत्तू हटकर, बाबू दगडू हटकर व इतर 15 जणांना सातबारा उतार्‍याचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार केशवराव होन यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com