अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

स्नेहलता कोल्हे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी परिसरातील चासनळी, धामोरी, हांडेवाडी, कारवाडी, मोर्विस या पाच गावात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (LOSS) झाले त्याचे तातडीने पंचनामे (Punchnama) करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, (Demand for compensation) अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांच्याकडे केली आहे.

त्यांनी म्हटले आहे, चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे. मात्र तो ढग फुटी सदृश पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस पिके, चाळीत साठवलेला कांदा (onion), फळबागा (Orchards), शेड (Shead), तात्पुरते झाप यासह मोठ्या प्रमाणात नुकसान (Loss) झाले आहे. आधीच करोना (Corona) महामारीमुळे अनेकजण अडचणीत आलेले आहेत. त्यात ढगफुटीचे संकट या पाच गावांतील रहिवाशी व शेतकर्‍यांवर ओढवलेले आहे. त्यामुळे त्यांचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तात्काळ करावेत, तहसीलदारांनी (Tahasil) त्याची पाहणी करून योग्य स्वरूपाचा अहवाल तयार करावा व त्यांना मदत द्यावी.

त्याचप्रमाणे मागिल हंगामाचा पीक विमा (Last season's crop insurance) अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेला नाही तो देखील तात्काळ द्यावा, अशी मागणी सौ. स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी केली आहे. तालुक्याच्या अन्य भागात अजून मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही तेव्हा शेतकर्‍यांनी पीक पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com