राष्ट्रीय रायफल शुटिंग स्पर्धेत स्नेहा जंगलेचे यश

राष्ट्रीय रायफल शुटिंग स्पर्धेत स्नेहा जंगलेचे यश

करजगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील पानेगाव येथिल स्नेहा श्रीकांत जंगले हीने त्रिवेद्रम (केरळ) येथे झालेल्या खुल्या 65 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल पीप साइट प्रकारात सहभागी होत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले.

तसेच तिने या स्पर्धेमध्ये 614.9 गुण मिळवले. 65 व्या राष्ट्रीय स्पर्धे करता संपूर्ण भारतातून सुमारे पाच ते सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच भोपाळ येथे होणा-या 1 & 2 इंडियन टीम ट्रायल्स व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. स्नेहाला प्रशिक्षक छबुराव काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आज रविवारी सकाळी अकरा वाजता तिचे पानेगाव येथे आगमन झाले. यावेळी तिचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी तीचे वडील श्रीकांत जंगले, आई रेखा, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या संचालिका अलका जंगले, सरपंच संजय जंगले, बाबासाहेब जंगले, बबनराव जंगले, डॉ कडुबाळ कर्डिले, संदिप जंगले, पाराजी गुडधे, डॉ जयवंत गुडधे, राजेद्र नवगिरे,अमित जंगले, सुजित कडु आदिसह पानेगाव, करजगाव, अंमळनेर परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थीत राहुन तीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com