कोतवाली पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा

तीनशे किलो मांस जप्त || एक अटकेत
कोतवाली पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलिसांनी गुरूवारी पहाटे बाबा बंगाली येथील सार्वजनिक शौचालयासमोर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. 60 हजार रुपये किंमतीचे तीनशे किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी एकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार अभय रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे.

मोमीद नजिर कुरेशी (वय 22 रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. बाबा बंगाली येथील सार्वजनिक शौचालयासमोर गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार कदम, सलीम शेख, रामनाथ हंडाळ यांच्या पथकाने पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला. तेथे मोमीद नजिर कुरेशी हा गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील 300 किलो गोमांस, एक सत्तूर असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com