संगमनेर : कत्तलखान्यांवर पोलिसांची कारवाई

1 कोटी रुपयांचे गोमांस जप्त || विज बंद करुन वाहनांवर दगडफेक
संगमनेर : कत्तलखान्यांवर पोलिसांची कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

बजरंग दलाच्या (Bajrang Dal) आक्रमक भूमिकेनंतर (Aggressive Roles) संगमनेर (Sangamner) शहरातील 5 कत्तलखान्यांवर (Slaughterhouses) अहमदनगर पोलिसांनी छापे (Ahmednagar Police Raid) टाकले. या कारवाईत तब्बल एक कोटी 4 लाख रुपयांचे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस जप्त (Seize the Meat) केले असून 70 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील कत्तलखान्यावर (Slaughterhouses) केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

ही कारवाई शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई सुरू असताना परिसरातील काही व्यक्तींनी वीज पुरवठा खंडित करून बजरंग दलाचे (Bajrang Dal) पदाधिकारी व प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतीलाल जैन यांच्या वाहनावर दगडफेक (Throwing stones at the vehicle) केल्याने वातावरण काहीवेळ तणावपूर्ण बनले होते.

वहिद कुरेशी, मुद्दसर हाजी, नवाज कुरेशी, जहिर अवर कुरेशी, परवेज कुरेशी, कलीम सलीम खान, अबीदुरहक अब्दुलजबर (सर्व रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अबीदुरहक अब्दुलजबर (वय 25) व कलीम सलीम खान (वय 21) यांना अटक करण्यात आली आहे तर इतर फरार झाले आहे.

संगमनेर शहरात (Sangamner city) गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने (Illegal slaughterhouses) सुरू आहे. या कत्तलखान्यांत दररोज शेकडो जनावरांची कत्तल होत असून हजारो किलो मांस निर्यात केले जात आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही शहरात या कायद्याचे खुलेआम उल्लंघन (Violation) केले जात आहे. स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष (Ignore) झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच संगमनेरातील कत्तलखान्यांसंदर्भात बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी माहिती घेत बजरंग दलाचे भिवंडी (Bhiwandi) येथील पदाधिकारी व प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतीलाल जैन यांनी संगमनेरातील (sangamner) कत्तलखान्यांसंदर्भात पुढाकार घेतला.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन संगमनेर येथील कत्तलखान्यांसंदर्भात तक्रार केली. या तक्रारीची विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन अहमदनगर येथील पोलीस प्रमुखांना याबाबत माहिती दिली.

Related Stories

No stories found.