कत्तलीसाठी डांबलेल्या 10 गाईंची सुटका

नगर तालुका पोलिसांची कारवाई
कत्तलीसाठी डांबलेल्या 10 गाईंची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) वाळकी (Walaki) येथे कत्तलीसाठी (Slaughter) डांबलेल्या एक लाख 78 हजार रूपये किंमतीच्या 10 गाईंची सुटका (Release of the Cows) करण्यात नगर तालुका पोलिसांना (Nagar Taluka Police) यश आले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. मोसिन कुरेशी (रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आप्पासाहेब बाबासाहेन नाईकयाली (वय 38 रा. तांदुळनेर ता. राहुरी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथे मोसिन कुरेशी याने एक लाख 78 हजार रूपयांच्या 10 गाई कत्तल करण्यासाठी डांबून ठेवल्या होत्या. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना कत्तल करण्यासाठी वाळकी (Walaki) येथे गाई डांबल्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नगर तालुका पोलिसांनी कारवाई करत गाईंची सुटका केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मारग या प्रकरणाचा तपास करत आहे.

Related Stories

No stories found.