कत्तलीसाठी ठेवलेल्या चार जनावरांची सुटका

कोतवाली पोलिसांची झेंडीगेटमध्ये कारवाई
कत्तलीसाठी ठेवलेल्या चार जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी आणलेल्या एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या चार गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी समीर बाबूलाल कुरेशी (रा. शिंपी गल्ली, झेंडीगेट) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम, प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. पोलीस नाईक अब्दुलकादर इनामदार यांनी फिर्याद दिली आहे.

झेंडीगेट परिसरातील शिंपी गल्लीमध्ये एका व्यक्तीने कत्तलीसाठी काही गोवंशीय जनावरे आणली असल्याची माहिती कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कोतवालीच्या पथकाने झेंडीगेट परिसरातील शिंपी गल्लीत छापा टाकला. यावेळी कत्तलीसाठी बांधून ठेवलेली चार जनावरे त्यांना मिळून आली. पोलिसांना पाहताच आरोपी कुरेशी पसार झाला. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com