कत्तलीसाठी जाणार्‍या 16 जनावरांची सुटका

नगर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई
कत्तलीसाठी जाणार्‍या 16 जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप नगर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोठला भागात रविवारी (दि. 22) रात्री पकडला. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार मन्सूर पाशामिय्या सय्यद यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अरबाज इलियास अहमद कुरेशी (वय 26 रा. तापकिर गल्ली, दाळ मंडई, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरेशीकडून लहान- मोठी 16 जनावरे, टेम्पो असा तीन लाख 68 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. अंमलदार सय्यद यांची कोठला भागात रविवारी दिवसभर ड्यूटी होती. ते ड्यूटीवर असताना त्यांना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांचा फोन आला व त्यांनी सांगितले, बातमीदारामार्फत माहिती मिळाली असून कोठला भागातून एका पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे.

खात्री करून कारवाई करा, असा सूचना आल्याने अंमलदार सय्यद यांनी संबंधित वाहनाचा शोध घेतला असता त्यांना पिकअप (एमएच 16 सीडी 1705) मध्ये 16 लहान मोठी जनावरे मिळून आली. पिकअप मधील अरबाज इलियास अहमद कुरेशी याच्या कडे चौकशी केली असता त्याने ही जनावरे कत्तलीसाठी चालवली असल्याची माहिती दिली. दरम्यान, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली व गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com