कत्तलीसाठी जाणार्‍या पाच जनावरांची सुटका

एलसीबीची कामगिरी || दोघांवर गुन्हा, एक अटकेत
कत्तलीसाठी जाणार्‍या पाच जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पोमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. निमगाव वाघा (ता. नगर) शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली. 85 हजार रूपयांची पाच जिवंत जनावरे, पाच लाख रूपये किमतीचा टेम्पो असा एकुण पाच लाख 85 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.

विलास वामन ढगे (वय 41 रा. जळवाडी, वाळकी ता. नगर) व जाहिद रऊफ सय्यद (रा. कोठला, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विलास ढगे याला अटक केली असून जाहिद रऊफ सय्यद पसार झाला आहे. निमगाव वाघा ते केडगाव जाणारे रोडवर काही इसम टेम्पोमधुन गोवंश जनावरांची वाहतुक करून कत्तलीसाठी घेवुन जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोलीस अंमलदार विजय वेठेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव, भरत बुधवंत यांच्या पथकाला निमगाव वाघा शिवारात सापळा लावण्याचे आदेश दिले.

पथक निमगाव वाघा शिवारात सापळा लावुन थांबलेले असताना त्यांनी संशयीत टेम्पो येताच थांबवला. चालकाने टेम्पो थांबवताच एक इसम टेम्पोमधुन उडी टाकुन पळाला. दरम्यान चालक विलास वामन ढगे याला पकडले. सदर टेम्पोची पाहणी करता पाठीमागील हौदामध्ये लहान मोठी पाच जिवंत जनावरे मिळून आली. ढगेकडे चौकशी केली असता सदर टेम्पो व गोवंशीय जनावरे ही पळुन गेलेला इसम जाहिद रऊफ सय्यद याचे सांगण्यावरून कत्तल करण्यासाठी घेऊन चाललो असल्याची कबुली दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com