कत्तलीसाठी गायी घेवून जात असलेला टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला

दोघांवर गुन्हा दाखल
कत्तलीसाठी गायी घेवून जात असलेला टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

कत्तलीसाठी औरंगाबादकडे घेवून जात असलेल्या 4 गायींचा टेम्पो नेवासा पोलिसांनी रविवारी सकाळी पकडला असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा व राहुरी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलीसाठी गायी घेवून जात असलेला टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला
कापूस, कांदा व सोयाबीनचे दर कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, कार्तिकी एकादशी असल्याने मी व पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हवालदार श्री. गिते, कॉन्स्टेबल श्री. गुंजाळ, श्री. इथापे, व कॉन्स्टेबल वसीम इनामदार असे आम्ही सर्वजण तुकाराम महाराज चौक येथे ड्युटीवर असताना सकाळी 8:15वाजण्याच्या सुमारास एक टाटा कंपनीचा टेंपो खुपटीकडून नेवाशाकडे येताना दिसला. टेम्पो (एसी पिकअप गाडी) थांबवला असता त्यामध्ये 5 गायी निर्दतेने दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबून भरलेल्या होत्या. सदर गायी व अंदाजे सव्वा लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कत्तलीसाठी गायी घेवून जात असलेला टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला
नगर भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल

चौकशी केली असता सदर गायी अमोल जगन्नाथ भोसले (वय 37) रा. राहुरी खुर्द याने नदीम सत्तार चौधरी रा. नेवासा खुर्द याचे मालकीच्या त्याचे टाटा कंपनीची एसी पिकपगाडी (एमएच 17 बीवाय 6937) मध्ये निर्दयतेने दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबून कत्तल करण्यासाठी औरंगाबाद दिशेने वाहतुक करताना मिळून आला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1976 चे सुधारीत कलम 2015 चे कलम 5(अ), (1) 9 व प्राण्यास निर्दयीपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम क. 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कत्तलीसाठी गायी घेवून जात असलेला टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला
गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी घाबरू नये
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com