कत्तलीसाठी चालविलेल्या गायीला वाचविले

कत्तलीसाठी चालविलेल्या गायीला वाचविले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर बजरंगनगर परिसरात एका गाईला कत्तलीच्या उद्देशाने आणत असल्याची माहिती शिवप्रहार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानुसार त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बडे, पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या गायीची सोडवणूक केली.

यावेळी पोलिसांनी टाटा जीप (क्र. एम एच 12 एलटी 8372) पंचांसमक्ष ताब्यात घेऊन तोसिफ सलीम तांबोळी (वय 22, रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) यालाही ताब्यात घेतले. या घटनेत 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल श्री. कातखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तौफिक सलीम तांबोळी याच्याविरूद्ध महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियमचे कलम 5, 5 ब, 9 सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11 च, ज प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com