कत्तलीसाठी डांबून ठेवलेली गोवंश जातीची जनावरे पकडली

कत्तलीसाठी डांबून ठेवलेली गोवंश जातीची जनावरे पकडली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलीसांनी (Shrirampur City Police) कत्तलीसाठी (Slaughter) डांबून ठेवलेल्या गोवंश जातीच्या तीन गायींची सुटका (Release of the Cow) केली. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला असून एका अल्पवयीन तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल (Crime Filed Against a Minor) केला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांना (Shrirampur Police) मिळालेल्या गुप्त खबरीवरुन एकलहरे (Eklahare) ते टिळकनगर (Tilaknagar) जाणार्‍या रस्त्यावर टिळकनगर कारखान्याजवळ शहर पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला असता त्यांनी तेथे एक मालवाहू टेम्पो नं. एम 39 डब्ल्यू 0134 हा पकडला. त्यात तीन काळ्या रंगाच्या गोवंश जातीच्या गायी निर्दयीपणे बांधून व डांबून ठेऊन कोणतीही चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या प्रयोजनासाठी मिळून आल्या. पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी पोलीस नाईक गणेश भिंगारदिवे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वार्ड नं. 2 मधील कुरेशी मोहल्ला भागातील 17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5, 5 (अ), 5 (ब) 9 (अ) सह प्राण्यांना वागविण्याबाबत किंवा छळ करण्याबाबत कायदा 1960 चे कलम 11 ज प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राशिनकर याबाबत पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com