
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
कत्तलीसाठी जिवंत वासरांना घेऊन जाणार्या पिकअपला पोलिसांनी पकडण्याची घटना काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमज हद्दीमध्ये घडली. पिकअप मधील 30 वासरांची मुक्तता करण्यात आली असून याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी एका पिकअप मधून (एमएच 18 एए4255) 30 वासरांना कत्तलीसाठी नेले जात होते. पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी निमज परिसरात जाऊन या वाहनाचा शोध घेतला. या गावाच्या परिसरातील एका दुकानात जवळून पिकअप जात असताना पोलिसांनी या वाहनाला अडवले. वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये 30 जिवंत वासरे आढळले. पोलिसांनी वासरांसह पिकअप वाहन जप्त केले.
याबाबत पोलीस नाईक कचरू उगले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी नवशाद लालाभाई इनामदार रा.हिवरगाव आंबरे, ता. अकोले याच्याविरुद्ध गु.र.नं. 429/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारित सन 1995 चे कलम 5, 11, (अ),(5),(ब) 9, 11 प्राण्यांना निर्दयतेने वागण्यास अधिनियम 11(1) (ड), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हेडकॉन्स्टेबल वायळ करीत आहेत.