कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

एमआयडीसी पोलिसांची कारवाई || तिघांवर गुन्हा
कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी (Slaughter) घेऊन जाणार्‍या तीन गायी (Cow) व वासरांची एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) सुटका केली. टेम्पोसह 68 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रविवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर बायपास रोडने पुढे पिंपळगाव माळवी (Pimpalgav Malavi) रोडला डेंटल कॉलेजजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका
‘आनंदाचा शिधा’ लांबला

तिघांविरूध्द पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम, मोटार वाहन अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्ताफ इसाक शेख, जाफर हबीब पठाण, नावेद हबीब पठाण (सर्व रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) अशी गुन्हा दाखल (Filed a Case) झालेल्यांची नावे आहेत. एका टेम्पोमधून (एमएच 20 एटी 9627) गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी (Slaughter) वाहतुक केली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती.

कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका
तोफखान्यावर टाक्या सांभाळण्याची वेळ

त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना सोबत घेऊन डेंटल कॉलेजजवळ सापळा लावला. संशयीत टेम्पो येताच त्याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये तीन जनावरे मिळून आली. सदरची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे टेम्पोतीन तिघांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी टेम्पो व जनावरे ताब्यात घेतले असून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अंमलदार संदीप चव्हाण तपास करीत आहेत.

कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका
पोलिस अधीक्षकांसह तिघांना नोटीस
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com