म्हैसगावातून कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

येवले आखाड्यावरील दोन जणांवर गुन्हा दाखल
म्हैसगावातून कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील म्हैसगांव शिवारात संकरित (जर्सी) गाईची वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी संधीचा फायदा घेऊन काही जनावरे घेऊन वाहनासह पसार झाले आहेत. ही घटना दि. 15 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी येवले आखाड्यावरील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे रा. तांदूळनेर, ता. राहुरी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 15 जुलै रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान म्हैसगाव शिवारातील दरडगाव फाटाजवळील ठाकरवाडी मराठी शाळेसमोर यातील आरोपी हे त्यांचे जवळील बोलेरो पीकअप नं. एमएच 21- एक्स- 895 या गाडीमध्ये दाटीवाटीने संकरित जातीचे वासरे कत्तलीकरीता घेऊन जाण्यासाठी भरताना मिळून आले.

तेव्हा ते फिर्यादी व साक्षीदार यांना पाहून 8 हजार रुपये किंमतीची जरशी वासरे जागेवरच सोडून त्यांच्याकडील बोलेरो पीकअपमध्ये भरलेले काही वासरे घेऊन पळून गेले आहेत. नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी हसन पठाण, साहिल (पूर्ण नाव माहिती नाही) दोघे रा. येवले आखाडा, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा रजि. नं. 659/2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनयम 1995 चे कलम 5 (ब), 5 (क), 9 (अ), 9 (ब), 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक रामनाथ सानप हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com