शिरूरमध्ये म्युकरमायकोसिसचे सहा रुग्ण

शिरूरमध्ये म्युकरमायकोसिसचे सहा रुग्ण

शिरूर (तालुका प्रतिनिधी) - शिरूर तालुक्यात करोनानंतर म्युकरमायकोसिसचे (बुरशी) 6 रूग्ण आढळले असून 4 जण बरे झाले आहेत तर दोन जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे.

तालुक्यात करोना बाधित रुग्णांनंतर आता काही प्रमाणात म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव काही रुग्णांमध्ये दिसून आला आहे. आठ गावांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून यामध्ये दोघे संशयित होते. तर सहा जणांना या रोगाची लागण झाली होती. त्यापैकी चार रुग्ण बरे झाले आहेत.

तर दोघा जणांना ससून हॉस्पिटल व केएम हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू आहेत. करोना बाधित रुग्णांनी करोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस रोग होऊ नये किंवा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये यासाठी या रोगाची लक्षणे जाणवू लागल्यास डॉक्टरांची संपर्क साधून त्यांच्याशी सल्लामसलत करून तपासण्या करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com