नेवासा तालुक्यात वाढले सहा रुग्ण
सार्वमत

नेवासा तालुक्यात वाढले सहा रुग्ण

एका कैद्याचा समावेश

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

आज सकाळी तालुक्यात प्रशासनास आलेल्या अहवालात ६ रुग्ण करोना बाधित आढळले. तर तालुक्यातील रुग्ण संख्या १८५ वर पोहचली आहे.

नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी आढळल्या रुग्णाच्या संपर्कातील ३ व्यक्ती, तर नेवासा शहरात १ व्यक्ती तसेच कारागृहातील १ कैदी करोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे नेवासा कारागृहातील एकूण २३ आरोपी कोरोना बाधित झाले आहे. तर गणेशवाडी येथील १ व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात तो व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com