रस्तापुर येथे दोन महिन्याच्या बाळासह सहा करोना बाधित
सार्वमत

रस्तापुर येथे दोन महिन्याच्या बाळासह सहा करोना बाधित

चांदा ग्रामस्थांची चिंता वाढली

Nilesh Jadhav

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आतापर्यंत रुग्ण नसलेल्या रस्तापुरमध्ये करोनाने प्रवेश केला असून एकाच वेळी सहा रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नागरीकांनी घाबरुन न जाता नियमाच पालन करत काळजी घेण्याचे आवाहन गावचे सरपंच वसंतराव उर्किडे यांनी केले आहे.

आज सकाळी आलेल्या वैद्यकिय अहवालानुसार गावातील एकजण बाधित आढळला होता त्यानंतर वैद्यकिय पथकाने तेथे तातडीने धाव घेत तेथील संबंधित व्यक्तिच्या संर्पकातील चाळीस जणांची रॅपिड टेस्ट केली असता त्यातील पाच जण पॉझिटिव्ह आढळुन आले असल्याची माहिती चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रजनिकांत पुंड यांनी दिली आहे. यामध्ये दोन महिन्याचे बा समावेश आहे, मात्र त्या बाळाच्या आईचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. संबधित परिसर बंद करण्यात आला असून वैद्यकिय विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहे.  गावही पुढील सात दिवस बंद करण्यात आले असल्याचे संरपंच उर्किडे यांनी सांगितले.

दरम्यान रस्तापुरचा गावचा सर्वच प्रकारचा व्यवहार हा चांदा येथेच असल्याने चांदा ग्रामस्थांची धाकधुक वाढली आहे. गावात सध्या रोजच भयंकर गर्दी होत असून सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. विनामास्क ग्रामस्थ बिनधास्त फिरत आहेत प्रशासन करत असलेल्या आवाहनाकडे नागरीकांचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे.

Deshdoot
www.deshdoot.com