संगमनेरात आजपासून पुन्हा ठिय्या आंदोलन

प्रशासनाचे बारा वाजविण्याचा इशारा
संगमनेरात आजपासून पुन्हा ठिय्या आंदोलन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याला (illegal Slaughterhouse) जबाबदार असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर सात दिवसात निलंबनाची कारवाई (Police Suspension action) करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊनही अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई न झाल्याने शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक (Pro-Hindu Organizations are Aggressive) झाल्या आहेत. या मागणीसाठी (Demand) आज दि. 12 ऑक्टोबर रोजी 12 वाजता सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन (Movement) करणार आहे.

आता प्रशासनाचे आम्ही बारा वाजवू असा इशारा (Hint) संतप्त हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. संगमनेरातील बेकादेशीर कत्तलखाने संदर्भात भिवंडी (Bhiwandi) येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी पुढाकार घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर नाशिक (Nashik) व अहमदनगर (Ahmednagar) येथील पोलिस पथकाने संगमनेर (Sangamner) येथल कत्तलखान्यावर छापा (Slaughterhouse raid) टाकला होता. आतापर्यंतच्या या सर्वात मोठ्या ठरलेल्या या छाप्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे गोमांस आढळले होते. यानंतर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. चार तारखेला या संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हे आंदोलन केले होते.

शहरातील सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत, यातील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करावेत, जबाबदार असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. काल सात दिवस उलटूनही अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई न झाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी काल व्यापारी मंडळ सभागृहामध्ये हिंदुत्ववादी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीस वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय महाराज भोर, दिलीप महाराज भोर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे ज्ञानेश्वर थोरात, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कुलदीप ठाकूर म्हणाले आंदोलनानंतर शहरातील पाच कत्तलखाने पाडण्यात आले. अजून सहा कत्तलखाने बाकी आहेत, अधिकार्‍यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली नाही. लेखी आश्वासनाची मुदत आज संपल्याने आम्ही प्रांताधिकार्‍यांना दुपारी स्मरण पत्र दिले आहे. संगमनेरकर आंदोलन विसरलेले नाहीत. कारवाईसाठी प्रशासन टाळाटाळ करत असल्याने आम्ही उद्यापासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. प्रशासनाचे बारा कसे वाजवायचे हे आम्हाला समजतं असं ठाकूर यांनी सांगितले. श्रीराम गणपुले म्हणाले, कारवाईबाबत सक्षम अधिकार्‍यांकडून लेखी घेण्यात आले होते.

संगमनेर शहरात (Sangamner City) 11 व तालुक्यात त्यापेक्षाही अधिक बेकायदेशीर कत्तलखाने अस्तित्वात आहेत. हे सर्वच कत्तलखाने उद्ध्वस्त करायचे आहेत. पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी गणपुले यांनी यावेळी केली. याप्रसंगी दत्तात्रय महाराज भोर व दिलीप महाराज भोर यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.