
खर्डा |प्रतिनिधी| Kharda
कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या जामखेड (Jamkhed) तालुक्यातील खर्डा (Kharda) येथील तीन भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू (Three Brothers Lake Drowning Death ) झाल्याची घटना गुरूवारी (दि.5) दुपारी घडली. तर बुडणार्या आईला वाचवण्यात नागरीकांना यश आले आहे.
दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (16), सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (14) हे सख्खे भाऊबहिण तर चुलत भाऊ कृष्णा परमेश्वर सुरवसे (16) अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील महीला आज सकाळी खर्ड्यापासुन तीन किमी अंतरावरील असलेल्या अंतरवली फाटा (Antarvali Phata) येथील पाझर तलावात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी तीनही मुले आईला मदत करण्यासाठी सोबत गेले होते. कपडे धुत असतांना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मुलगी सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ही गोष्ट तिचा भाऊ दिपक ज्ञानेश्वर सुरवसे व कृष्णा परमेश्वर सुरवसे यांच्या लक्षात आल्यावर दोघाही भावांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांनाही पाण्याचा (Water) अंदाज आला नाही. शेवटी तेही पाण्यात बुडाले. सानिया व दिपक यांच्या आईच्या (Mother) हे लक्षात आल्यानंतर त्यांनीदेखील मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यादेखील पाण्यात बुडत असतांना आजुबाजूला आसलेल्या लोकांनी मुलांच्या आईला वाचवण्यात यश मिळविले. मात्र या घटनेत तीनही बहीण भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू (Unfortunate Death of Brother And Sister By Drowning) झाला.
नागरीकांनी बुडालेल्या मुलांना पाण्यातून बाहेर काढले व खर्डा (Kharda) येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पुर्वीच तिघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषीत केले. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आ. रोहित पवार, प्रा.मधुकर राळेभात, रमेश आजबे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने खर्डा व जामखेड (Jamkhed) परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.