सीना नदीपात्रातील अतिक्रमणावरून खडाजंगी

स्थायी सभेत नगरसेवकांकडून अधिकार्‍यांवर प्रश्नांचा भडीमार
सीना नदीपात्रातील अतिक्रमणावरून खडाजंगी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका स्थायी समितीच्या सभेत (Municipal Standing Committee Meeting) सीना नदीपात्रातील अतिक्रमणावरून (Encroachment in the Sina River Basin) जोरदार खडाजंगी झाली. सभापती कुमार वाकळेंसह (Speaker Kumar Wakle) सदस्य गणेश कवडे, विनित पाऊलबुद्धे, रवींद्र बारस्कर, मुदस्सर शेख आदींनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुतेंवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, त्यांनीही तो समर्थपणे परतवून लावत प्रशासकीय कामकाजाच्या अडचणी मांडल्या. त्यामुळे सीना नदीपात्र व त्यातील पुन्हा सुरू झालेली अतिक्रमणे (Encroachment) हा मनपात चर्चेचा विषय झाला.

शुक्रवारी स्थायी समितीची (Standing Committee) सभा सभापती वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सीना नदी (Sina River) पात्राच्या अतिक्रमणावरून (Encroachment) सभेत सुरूवातीला वादंग निर्माण झाले. सीना नदी पात्राच्या (Sina River Basin) सुशोभीकरणाचे काय झाले, नदीपात्रात पुन्हा अतिक्रमणे सुरू झालीत व दुकाने आणि व्यवसायांबरोबरच गाळ पेरात ऊस लावलाय, असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक कवडे यांनी उपस्थित केला.

यावर अभियंता सातपुते म्हणाले,‘गाळपेरीची परवानगी आपण (मनपा) देत नाही व त्यातील ऊस हा अतिक्रमणाचा विषय आहे. ते काढायला नवीन निविदा काढावी लागेल. ते ऐकल्यावर सभापती वाकळेंसह सार्‍या नगरसेवकांनी डोक्याला हात लावला. अखेर शहरातील ओढ्या-नाल्यांतील गाळ व कचरा काढणार्‍याकडूनच सीना नदी पात्रात जेथे पाणी साठते, त्या भागातील गाळ व कचरा काढून पाणी वाहते करण्याचा निर्णय घेतला गेला.

पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून शहरातील 50 च्यावर नाल्यातील गाळ, जलपर्णी व कचरा काढण्याचे काम सुरू आहे. ते निम्मे झाल्याचा मनपा प्रशासनाचा दावा (Municipal Administration Claims) आहे. त्यावरून स्थायी समितीच्या सभेत सुरुवातीपासूनच वादंग सुरू होते. त्यात कवडेंनी सीना नदीपात्र अतिक्रमणाचा विषय मांडला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या काळात नदी पात्रातील अतिक्रमणे काढून खोलीकरण व हद्द निश्चिती केली गेली होती आणि नदीपात्र सुशोभिकरणही हाती घेण्यात आले होते. मात्र, आता नदीपात्रात पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत व नदीपात्र अरुंद होऊन त्याची गटार झाली आहे, सुशोभिकरण तर दूरच राहिले, असे त्यांचे म्हणणे होते.

शहरातून जाणार्‍या या 14 किलोमीटरच्या नदीपात्रातील गाळपेरीत पुन्हा ऊस व अन्य पिकांची लागवड सुरू झाली आहे. काही जणांनी व्यावसायिक दुकाने पुन्हा थाटली आहेत. ही अतिक्रमणे दूर करून नदीपात्र मोकळे करण्याचे काम प्रशासन करणार की नाही?, असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला.

रक्तपिशवी 100 रुपयांना कधी ?

महापालिकेच्या यंदाचे बजेट स्थायी समितीने मंजूर करताना त्यात मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीद्वारे 100 रुपयात रक्त पिशवी उपलब्ध करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, या घोषणेला चार महिने होऊन गेले तरी अंमलबजावणी नाही व आजही तेथे 500 रुपये दिल्याशिवाय रक्तपिशवी मिळत नाही, असे बोलत सभापती वाकळेंनी संताप व्यक्त केला. मनपा बजेटमध्ये तरतूद केलेली ही योजना आहे. प्रशासनाचा प्रस्ताव वा स्थायी समितीचा त्यावरील ठराव नाही व त्याची गरजही नाही. मनपाचीच बजेटमधील ही योजना असताना केवळ तुमच्यामुळे (प्रशासन) आमच्याबद्दल 100 रुपयात रक्तपिशवी देण्याची खोटी आश्वासने देतात, असे लोक बोलत आहेत, असा प्रश्न उपस्थित करीत तातडीने ही योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com