सीनेच्या पूरात पिंपळगाव माळवीत पुलासह कार गेली वाहून

सीनेच्या पूरात पिंपळगाव माळवीत पुलासह कार गेली वाहून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahemdnagar

नगर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने सिना नदीला पूर आला होता. तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे सीना नदीला आलेल्या पूरात गावातील पूल वाहून गेला. याचवेळी पुलावरून जाणारी कारही प्रवाहात वाहून गेली. वाहनचालक गाडीतून वेळीच उडी मारल्याने बचावला.

सीनेच्या पूरात पिंपळगाव माळवीत पुलासह कार गेली वाहून
कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव

मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरासह, उपनगरातील अनेक भागात पाणीपाणी झाले होते. अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले होते. यामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसाने शहरातील रस्त्यांवर झालेल्या डागडुजीला पुन्हा उघडे पाडले आहे. अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पिंपळगाव माळवी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पिंपळगाव माळवी गावातील अमरधाम शेजारील सीना नदीचा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

सीनेच्या पूरात पिंपळगाव माळवीत पुलासह कार गेली वाहून
तहसीलदारांची महसूलमंत्री ना. विखे यांनी काढली खरडपट्टी

अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील सरपंच संजय प्रभुणे त्यांच्याकडे आलेले पाहुणे प्रणित पीटर जाधव (रा. पुणे) यांची कार नंबर एमएच 12 बीव्ही 7620 ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. शोध घेतल्यानंतर गाडी सागर गुंड यांचे शेताजवळ आढळून आली. कार क्रेनच्या मदतीने बुधवारी बाहेर काढण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com