शिंगणापूर पोलिसांकडून सराईत मोटारसायकल चोरास अटक

चार मोटारसायकली जप्त; सोनई पोलीस ठाण्यात आरोपीवर यापूर्वीचे चार गुन्हे
शिंगणापूर पोलिसांकडून सराईत मोटारसायकल चोरास अटक

खरवंडी |वार्ताहर| Kharwandi

रस्तालूट व विविध मोटारसायकलींच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या नेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथील एका आरोपीस शिंगणापूर पोलिसांनी काल अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

2 फेब्रुवारी 2021 रोजी चांदा येथील रवींद्र राजेंद्र कदम यांना कांगोणी फाटा येथील सुडके महाराज आश्रमाजवळ नितीन मोहन राशिनकर व नामदेव उत्तम मोहिते या दोघांनी रस्त्यात मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन 13 हजार 500 रुपये रक्कम तसेच दोन तोळ्याची सोन्याची चेन त्याचबरोबर विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज लुटून नेला होता. दोघा आरोपींपैकी नितीन मोहन राशिनकर याला तात्काळ पकडण्यात आले होते. तर दुसरा आरोपी नामदेव उत्तम मोहिते (वय 29) रा. म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा हा गुन्हा घडल्यापासून पसार होता. तो गावी येणार अशी माहिती मिळाल्यावर त्यास शिंगणापूर पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

सदर आरोपीच्या ताब्यातून चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्यामध्ये दोन होंडा शाईन, एक हिरोहोंडा स्प्लेंडर, एक बजाज प्लॅटिना या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

सदर आरोपीवर सोनई पोलिस ठाण्यात 157/2021, 583/2021, 427/2021 या क्रमांकाने भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे.

शनीशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. बागुल, सहाय्यक फौजदार श्री. कटारे, हवालदार श्री. माळवे, हवालदार श्री. बडे, पोलीस नाईक श्री. शिंदे, श्री. फुलमाळी, श्री. शेख, श्री. गोरे यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com