श्रीरामपूरची शिवानी छल्लारे छोट्या पडद्यावरील मालिकेत

श्रीरामपूरची शिवानी छल्लारे छोट्या पडद्यावरील मालिकेत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या फुलाला सुंगध मातीचा या मालिकेत श्रीरामपूरची कन्या शिवानी छल्लारे झळकणार आहे. ती या मालिकेत कल्पनाच्या भूमिकेत दिसणार आहे.शशि सुमित प्रॉडक्शन मुंबई यांच्या फुलाला सुंगध मातीचा ही मराठी मालिका सध्या खूपच चर्चेत असून महिलांमध्ये प्रसिध्द झालेली आहे.

ही मालिका सध्या चांगल्या वळणार असून हिचे चित्रीकरण सध्या राजस्थान राजकोट या ठिकाणी सुरु होते. तेथे झालेल्या चित्रिकरणात तिने कल्पना नावाची भूमिका साकारली आहे. यामलिकेत जामखेडकरांची पहिली सून सोनालीची बहिण कल्पनाची भूमिका साकारली आहे.

ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी 8.30 वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवानीची भूमिका कशी असणार याकडे श्रीरामपूरकरांच्या नजरा लागून आहे. शिवानीने या अगोदरही छत्रीवाली, क्राइमरोलमध्ये प्रेमा तुझा रंग कसा? या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवानी ही श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांची कन्या आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com