श्रीरामपूर : आता जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीचे 10 गण

नवीन निपाणीवडगाव गटाची निर्मिती
श्रीरामपूर : आता जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीचे 10 गण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीच्या दोन गणात वाढ झाली आहे. या फेरबदलामुळे पुर्वीच्या गट व गणांची तोडफोड झाली असून अनेकांची अडचण झाली आहे. यामुळे राजकीय समिकरणेही बदलणार आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात सन 2017 च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण होते.नव्या रचनेनुसार आता जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत. नव्या रचनेनुसार निपाणीवडगाव गटाची निर्मिती होऊन त्यात कारेगाव या नव्या गणाची निर्मिती झाली आहे. या गणात पुर्वीच्या पढेगाव गणातील मालुंजा बुद्रूक, भेर्डापूर, वांगी बुद्रूक, वांगी खुर्द, गुजरवाडी व खिर्डी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर पढेगाव गणात मातापूरचा नव्याने समावेश झाला आहे.

पुर्वीच्या उक्कलगाव गणातील खंडाळा गावचा दत्तनगर गणात तर दत्तनगर गणातील शिरसगावचा टाकळीभान गटात समावेश होऊन या शिरसगाव नव्या गणाची निर्मिती झाली आहे. एकूणच नव्याने निपाणीवडगाव गट व शिरसगाव व कारेगाव हे दोन गण वाढले आहेत. नव्या रचनेमुळे निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढणार असून तोडफोडीमुळे अनेकांचा अडचण झाली आहे. असे असले तरी या गट व गणातील आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. ते जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र समोर येणार आहे. या नव्या रचनेवर हरकती मागविण्यात आल्या असून 8 जून 2022 ही त्याची अंतिम मुदत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गट व गणांची रचना

1. उंदिरगाव गट- 14 ग्रामपंचायती, निमगाव खैरी गण- 10 ग्रामपंचायत

निमगाव खैरी, गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, जाफराबाद, रामपूर, नाऊर, सराला, माळेवाडी, गोवर्धनपूर.

उंदिरगाव गण- 4 ग्रामपंचायत

उंदिरगाव, माळवडगाव, हरेगाव, महांकाळवडगाव.

2. टाकळीभान गट : 9 ग्रामपंचायत -

टाकळीभान गण- खानापूर, भामाठाण, कमालपूर, मुठेवडगाव, घुमनदेव, टाकळीभान.

शिरसगाव गण- 3 ग्रामपंचायत- भोकर, वडाळामहादेव, शिरसगाव.

3. दत्तनगर गट - 13 ग्रामपंचायत

दत्तनगर गण - 5 ग्रामपंचायत

ब्राम्हणगाववेताळ, भैरवनाथनगर, दिघी, खंडाळा, दत्तनगर.

उक्कलगाव गण- 8 ग्रामपंचायत

उक्कलगाव, कडीत बु, कडीत खुर्द मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, एकलहरे, गळनिंब.

4. बेलापूर गट- 10 ग्रामपंचायत बेलापूर गण- 2 ग्रामपंचायत, 4 गावे

बेलापूर बु, ऐनतपूर, बेलापूर खु, नर्सरी.

पढेगाव गण- 6 ग्रामपंचायत- पढेगाव, मातापूर, वळदगाव, लाडगाव, कान्हेगाव, उंबरगाव.

5. निपाणी वडगाव गट 9 ग्रामपंचायत

निपाणी वडगाव गण- 2 ग्रामपंचायत

खोकर, निपाणीवडगाव.

कारेगाव गण- 7 ग्रामपंचायत कारेगाव, मालुंजा बु, भेर्डापूर, वांगी बु, वांगी खु, गुजरवाडी व खिर्डी.

- कारेगाव व शिरसगाव गणांची निर्मिती

- पढेगाव गणातील 6 गावांचा कारेगाव गणात समावेश

- मातापूरचा बेलापूर गणात समावेश

- खंडाळाउक्कलगाव मधून दत्तनगर गणात

- शिरसगावचा दत्तनगर मधून टाकळीभान गटात समावेश

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com