गावठी कट्टा प्रकरणी श्रीरामपुरातून तरूण ताब्यात

गावठी कट्टा प्रकरणी श्रीरामपुरातून तरूण ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - गावठी कट्टाप्रकरणी अहमदनगर एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील स्वरस्वती कॉलनीतून एका तरूणास ताब्यात घेतले ही कारवाई काल मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.

श्रीरामपूर शहरातील स्वरस्वती कॉलनीतील एक तरूण गावठी कट्टा विक्री करीत असल्याची माहिती नगरच्या एलसीबीच्या पथकास मिळाली. त्यानुसार हे पथक श्रीरामपूर शहरात दाखल झाले. त्यांनी ज्या तरूणाने कट्टा विकला होता.

त्यास ताब्यात घेतले. यावेळी झटापट झाल्याचेही समजते. या तरूणाला ताब्यात घेतल्यानंतर ज्याला त्याने कट्टा विकला त्याच्याकडे घेऊन गेले. ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com