श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण

रांजणखोल येथील चार जणांवर गुन्हा दाखल
श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागील भांडणाच्या कारणावरून श्रीरामपूर (Shrirampur) येथील तरुणाला बेदम मारहाण (Youth Beating) करण्यात आली. याप्रकरणी राहाता (Rahata) तालुक्यातील रांजणखोल (Rajankhol) येथील चार जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. प्रतीक उल्हास प्रधान (रा. बोंबलेनगर, वार्ड नं. 7, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला (Shrirampur Police Station) फिर्याद दिली आहे.

श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण
राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

फिर्यादीत म्हटले आहे की. मी सरफेस कोटीग कंपनीमध्ये कामासाठी गेलो असता मी कंपनीमध्ये असताना माझ्याकडे किसन ढोकचौळे आले व तु बाहेर चल, असे म्हणाले. मी त्याच्यासोबत बाहेर आलो व मला त्याचे मोटारसायकल घेवुन वाकडी फाटा येथे आणले व मागील भांडणाच्या कारणावरुन किसन ढोकचौळे, द्त्तु बाळासाहेब ढोकचौळे, शिवाजी शंकर ढौकचोळे व कैलास भाऊसाहेब ढोकचौळे (रांजणखोल, ता. राहाता, जि. अ.नगर) यांनी कैलास ढौकचोळे यांच्या हातातील लोखंडी चैन, पट्टीने पाठीवर मारले व किसन ढोकचौळे व दत्तु ढौकचोळे, शिवाजी ढौकचोळे यांनी लाथाबुक्यानी मारहाण केली. दत्तु ढोकचौळे याने त्याच्या हातातील फायटरने माझ्या उजवे हातावर, बरगडीवर व तोंडावर मारले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली.

श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण
विखे-मुरकुटे-ससाणे ‘अजब’ युतीला तडा

यानंतर आपम दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालो. दवाखाना जबाबावरुन शहर पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा रजि. नं. 450/2023 भा.दं.वि कलम 324, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रघुवीर कारखिले, साईनाथ राशिनकर हे करीत आहेत.

श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण
यंदा शेतकर्‍यांना मिळणार 333 कडबाकुट्टी यंत्रे

दरम्यान, हे वाद (Dispute) दत्तनगर चौकातील वाकडी फाटा, टिळकनगर पोलीसचौकी समोरच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या वादाच्या (Dispute) घटना घडत असतात. चोरीचे प्रमाणही वाढत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व डीवायएसपी संदीप मिटके यांनी पोलिसांना योग्य सूचना देऊन या भागात विशेष लक्ष देण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण
श्रीरामपूर बाजार समितीत ‘योगायोग’
श्रीरामपूरच्या तरुणाला बेदम मारहाण
कर्नाटकातील यशाने जिल्हा काँग्रेस उत्साहित
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com