विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत संताप
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

नाऊर (वार्ताहर)

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील नाऊर (Naur) येथील शेतकरी कुंटुंबातील विलास अशोक देसाई (वर 41) वर्ष या तरुणाचा पोलवरील तारेला चिकटून दुर्देवी मृत्यू झाला.

आपल्या घराचा वीज पुरवठा गेल्या 2 दिवसापासून बंद असल्याने दुपारी 1 च्या दरम्यान संबधित कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावातील लाईट पुरवठा बंद असुन त्यामुळे स्वःतच्या घराजवळ असलेच्या पोलवर मयत विलास गेला असतांना विद्युत शॉक (Electric shock) बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. मयत विलास हा घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. त्याच्या पश्‍चात वृद्ध आई, पत्नी, 1 मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.

महावितरणच्या (MSEDCL) गलथान कारभारा विषयी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मरत विलासच्या कुंटूबियाला महावितरणने (MSEDCL) तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार सतिश गोरे व कॉन्स्टेबल संतोष बढे हे करत आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com