वॉर्ड नं. 2 कंटेन्मेंट झोनमधून वगळा
सार्वमत

वॉर्ड नं. 2 कंटेन्मेंट झोनमधून वगळा

अन्यथा श्रीरामपूर शहर पूर्ण बंद करा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आल्याने या ठिकाणी हातावर पोट भरणार्‍या कामगार आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वॉर्ड नं. 2 मधील कंटेन्मेंट झोनमधून वगळावे; अन्यथा श्रीरामपूर शहर बंद करण्यात यावे, अशी मागणी वॉर्ड नं. 2 मधील नगरसेवकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक मुजफ्फर शेख, राजेश अलघ, अंजूम शेख, राजेश अलघ, अंजूम शेख, रवींद्र गुलाटी, मुख्तार शहा यांच्यासह रईस जहागिरदार, कलूम कुरेशी, मुन्ना पठाण, साजिद मिर्झा, अहमद जहागिरदार आदी उपस्थित होते.

तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड नं. 2 मधील करोना रुग्ण आढळून आल्यामुळे सदर भाग हा दि. 4 जुलै 2020 पासून ते 18 जुलै 2020 पर्यत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यानंतर सदरचा कालावधी हा 23 जुलैपर्यंत वाढविण्यात आला होता. सदरची मुदत 23 जुलै 2020 रोजी सायं. 6 वाजता संपत आहे.

वॉर्ड नं. 2 मध्ये कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आल्यामुळे आजारी, अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणे व सुविधा पुरविण्याकामी अडचणी निर्माण होत आहेत. दैनंदिन आरोग्याची कामे करण्याकामी अडचणी निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण निघाला तोच भाग सील करावा पूर्ण वॉर्ड नं. 2 ला वेठीस धरू नये, असे सांगत श्रीरामपूर शहर पूर्णपणे बंद करण्यात यावे अन्यथा वॉर्ड नं. 2 मध्ये कन्टेन्मेंट झोन रद्द करण्यात यावा, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com