श्रीरामपुरात विवाहित कामगार महिलेचा विनयभंग

कापड दुकानाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपुरात विवाहित कामगार महिलेचा विनयभंग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील कापड दुकानात काम करणार्‍या विवाहित महिलेचा दुकान मालकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत दुकान मालकाविरूद्ध विनयभंग, धमकी व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. 14 रोजी दुपारी आपण नेवासा रोडवरील श्री केसरीनंदन या दुकानात बॅग्ज आवरत असताना दुकान मालक संतोष खाबिया याने जवळ येऊन आपला हात धरला. तसेच जवळ ओढत चुंबन घेतले. आपण त्याला विरोध केला असता त्याने, तु खालच्या जातीची आहे, तु माझे काही करू शकत नाही, मी तुला व तुझ्या नवर्‍याला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

या फियार्यादीवरून पोलिसांनी दुकान मालक संतोष सुमनचंद खाबिया (वय 47, रा. वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 356, 504, 506 तसेच अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक संदिप मिटके हे करीत आहेत.

ही घटना समजताच या दुकानासमोर मोठी गर्दी जमली होती. यावेळी काही महिलांनी दुकानमालकाची चांगलीच धुलाई केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट देत दुकान मालकास ताब्यात घेतले. या घटनेने शहरातील कापड दुकानात काम करणार्‍या महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com