
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक, हुसेननगर या भागातून एक पन्नास वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहरातील हुसेननगर वार्ड नं 1 मधील गुलशनबी रफिक पठाण (वय 50) ही महिला दि. 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी कोणास काही एक न सांगता घरातून निधून गेली आहे.
या महिलेचा तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रफिक इसराईल पठाण यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मिसिंग रजि नं 16/2023 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. सदर महिला कुणाला आढळून आल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.