प्रभाग क्र. 14 मध्ये आयोजित करोना चाचणी शिबिरात 95 जणांची तपासणी

9 करोनाबाधित पॉझिटिव्ह
प्रभाग क्र. 14 मध्ये आयोजित करोना चाचणी शिबिरात 95 जणांची तपासणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील प्रभाग क्र. 14 मधील बाजार तळ या ठिकाणी शासकीय करोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 95 नागरिकांची अ‍ॅटींजन रॅपीड चाचणी करण्यात आली असून यात 9 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती या प्रभागाचे नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण व सौ. वैशाली चव्हाण यांनी दिली.

प्रभाग 14 चे नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण आणि प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका सौ वैशाली दिपक चव्हाण यांच्या सौजन्याने बाजार तळ येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शासकीय करोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सध्या नागरीकांना टेस्टिंगसाठी ग्रामीण रुग्णालय अथवा खाजगी लॅबमध्ये तपासणी करावी लागत आहे. याच अनुषंगाने नगरपरिषद रुग्णालयाचे डॉ. सचिन पर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली भागतील सुमारे 95 नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली.

त्यापैकी 9 नागरिक कोरोनाबाधित आढळले. सदर नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारास पाठविण्यात आले. तसेच नगरसेवक दिपक चव्हाण यांनी डॉ शिरसाठ यांच्यासोबत बोलून त्यांच्या सीटीस्कॅन सेंटर येथे नागरीकांना सवलतीच्या दराने सीटी स्कॅन देखील उपलब्ध करून दिले.

याप्रसंगी डॉ पर्‍हे, नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण, वैशाली दिपक चव्हाण उपस्थित होते. परिचारिका दीपाली माळवे, जयश्री धीवर आणि आशाताई पगारे यांनी टेस्टिंगची जबाबदारी पार पाडली.

तसेच भागतील शिव सर्कल ग्रुप, जय सेवा मित्रमंडळ, दिपक चव्हाण विचार मंच, जय श्रीराम ग्रुप, जगदंब युवा प्रतिष्ठान, भीमरत्न प्रतिष्ठान, शिव सर्कल युवा प्रतिष्ठान, खालसा दल, ओन्ली बजरंग ग्रुप, जय बजरंग जय वडार मित्रमंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, जय तुळजा भवानी मित्रमंडळ, साई श्रद्धा मित्रमंडळ आदि मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com