श्रीरामपूरची अंतिम प्रभागरचना 6 जूनला जाहीर होणार

श्रीरामपूरची अंतिम प्रभागरचना 6 जूनला जाहीर होणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मार्च 2022 पासून सुरु झालेल्या टप्यांपासून निवडणुकीची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले असून या अनुसरुन प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीपासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारीत कार्यक्रमानुसार सोमवार दि. 6 जून 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची माहिती श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

प्रारुप प्रभागरचनेच्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दि.10 मे 2022 असून त्यावर हरकती व सूचना करण्याच्या कालावधी मंगवार 10 मे 2022 ते शनिवार दि. 14 मे 2022 पर्यंत मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद यांच्याकडे सादर कराव्यात. सोमवार दिण 23 मे 2022 रोजी प्राप्त हरकतींवर व सुचनांवर सुनावणी होणार आहे. सोमवार दि. 30 मे 2022 पर्यंत हरकती सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून राज्य निवडणूक आयुक्त /विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविले जाणार आहेत.

त्यानंतर 6 जून 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली. हरकती व सूचना दाखल करणार्‍या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे. मंगळवार दि. 7 जून 2022 पर्यंत अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.