श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपिड टेस्ट

पॉझिटिव्ह इसमांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी
श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपिड टेस्ट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरून विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात पॉझिटीव्ह रुग्णांची थेट कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली आहे.

या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी चौकाचौकांत कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली जात होती. तरीही विनाकारण फिरणार्‍यांची गर्दी कमी होत नसल्याची परिस्थिती पाहून काल श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसे पोलीस पथकासह नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी यांनी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी नाकाबंदी लावून विनाकारण फिरणार्‍यांचे वाहन अडवून वाहन चालकांना रॅपीड टेस्ट करण्याची शिक्षा त्यांना दिली.

तसेच त्यांचे वाहन जप्त करुन त्यांचेवर कारवाई केली. काल एकूण 85 जणांची रॅपीड टेस्ट केली असून त्यापैकी 2 जण पॉझिटीव्ह आढळून आले असून 83 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करुन त्यांचेवर उपचार सुुरू केले. अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे या चौकात विनाकारण फिरणार्‍यांची संख्या आपोआपच कमी झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com