श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍यांची प्रशासनाकडून करोना चाचणी

श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍यांची प्रशासनाकडून करोना चाचणी

श्रीरामपूर | Shrirampur

श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज सोमवारी सकाळपासूनच पोलीस व प्रशासनाने विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवर करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये करोना पॉझिटिव्ह आल्यास या नागरिकाला थेट कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येत असून करोना निगेटिव्ह आल्यास दंडात्मक कारवाई प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सकाळी छत्रपती शिवाजी चौकातून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

दोन दिवसापूर्वी श्रीरामपुरात करोना रुग्णसंख्येने अचानक मोठी झेप घेतली होती. सरासरी 200 च्या आसपास असणारा रुग्ण संख्येचा आकडा दोन दिवसापूर्वी चारशेच्या घराजवळ गेला होता. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचे बोलले जाते. तरी विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांवर प्रशासन आता जागेवर करोना चाचणी करण्याची कारवाई करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com