श्रीरामपूर-वाकडी रस्त्याला लवकरच मंजुरी - आ. विखे

श्रीरामपूर-वाकडी रस्त्याला लवकरच मंजुरी - आ. विखे

धनगरवाडी |वार्ताहर| Dhangarwadi

राहाता तालुक्यातील वाकडी ते धनगरवाडी फाटा या रोडच्या डांबरीकरणासाठी आत्ता आमचं सरकार आहे, तेव्हा या सरकारकडून चाळीस लाख रुपये मंजूर करून घेऊ, असे आश्वासन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

वाकडी गावातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच आ. विखे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके, सरपंच डॉ. संपतराव शेळके, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीपराव लहारे, भीमराज लहारे, अण्णाभाऊ कोते, निलेश लहारे, अशोकराव कोते, धनगरवाडीचे भीमाशंकर लोखंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

विखे पाटील यांनी वाकडी ते गणेशनगर साठी मागील वर्षी 50 लाख दिले होते व पुन्हा वाकडी ते श्रीरामपूर साठी 40 लाख मंजूर केले होते. परंतु काही काळांतराने सरकार बदलल्यानंतर ते 40 लाख मंजूर केलेले मागे गेले. परंतु आत्तापुन्हा चाळीस लाख रुपये मंजूर करून आणतो. वाकडी ते धनगरवाडी फाट्यापर्यंत काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com