पोलिस पाटलाकडून तहसीलदारांच्या आदेशाचा भंग!

शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले निलंबनाच्या मागणीचे निवेदन
पोलिस पाटलाकडून तहसीलदारांच्या आदेशाचा भंग!

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील महांकळवाडगांव शिवारात सामुहिक वहीवाटीच्या रस्ता वाद प्रकरणात 11 महिन्यानंतर तहसिलदार यांनी अर्जदारांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, सामनेवाले यांनी प्रांत अधिकाऱी यांचेकडे रिव्हीजन अर्ज दाखल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्याय मिटविण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी दस्तुरखुद्द पोलीस पाटलांनीच स्वत: पदाचा गैरवापर करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून वहीवाट बंद पाडला आहे. त्यामुुळे संतप्त अर्जदार शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची समक्ष भेट घेऊन तहसिलदार यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलास बडतर्फ करावे, या मागणीचे निवेदन सादर केले.

पोलिस पाटलाकडून तहसीलदारांच्या आदेशाचा भंग!
पारनेर तहसीलदारांच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अर्जदार शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, आमच्या वडीलोपार्जित वहिवाटीचे नेहमीचे रस्त्यास हरकत, अडथळे करू नये म्हणून मामलेदार कोर्ट अ‍ॅक्ट 1906 चे कलम 5(2)अन्वये दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन तहसिलदार श्रीरामपूर यांनी आमचा अर्ज दि. 9 जुलै 2021 रोजी मंजूर केला होता. त्यानंतर नमुद वादातील सामनेवाले यांनी प्रांताधिकारी श्रीरामपूर यांचेसमोर मामलेदार कोर्ट अ‍ॅक्टचे कलम 23अन्वये आरटीएस रिव्हीजन अर्ज नं.155/2020 दाखल केला होता. दि. 30 जुलै 2021 रोजी प्रांताधिकारी यांनी आम्हाला नोटीसा काढून सदरील रिव्हीजन अर्जामध्ये आम्ही हजर होईपर्यंत ‘जैसे थे’चाआदेश केला होता.

त्यानंतर थोड्याच दिवसांनी पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीने सदरील रस्त्याचा वाद न्यायप्रविष्ट असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्ता नांगराला. जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करून आम्हाला वहीवाटीस प्रतिबंध केला. जाण्यास मज्जाव करून धमकावणयाचा प्रयत्न केला.

पोलिस पाटलाकडून तहसीलदारांच्या आदेशाचा भंग!
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

गावात कायदा सुव्यवस्था सुरळीत राहून महसूल व पोलीस अधिकार्‍यांना गावातील वादाची माहिती सादर करणे हे पोलीस पाटलांचे कर्तव्य असताना शासनाचे मानधन घेणार्‍या पोलीस पाटलाने तहसिलदार यांचे न्यायालय आदेशाचा भंग करत कायदा हातात घेतला. तरी त्यांच्या या कृत्याची चौकशी करून शासनाच्या पोलीस पाटील सेवेतून त्यांना बडतर्फ करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

या अर्जावर केशव आसाराम बडाख, रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी, शेषराव गंगाधर वानखेडे, असिफ यासिन बेग, शिवाजी गेणूजी बडाख, सोमनाथ नामदेव आव्हाड, जमादार बालम शेख, शिवाजी तुकाराम धनवटे, नजीर इस्माईल शेख, किशोर ज्ञानदेव बडाख, वाल्मीक बबन बडाख यांची नावे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com